Product Details

DREAMS ALOE - VERA JUICE

Price Offer Price

Ayurvedic Digestive System Management . ॲलोवेरा म्हणजे कोरफड हे नाव आपल्या सगळयांना परीचीत आहे. ही एक औषधी वनस्पती म्हणुन प्रसिद्ध आहे. बाजारात कोरफड पासुन बनवलेली बरेच उत्पादनं अगदी सहज उपलब्ध आहेत. तसं पाहिले तर प्राचीन काळापासुन कोरफडचा उपयोग होत असल्याचं आपल्याला दिसतं, इतकचं काय तर ईजीप्त मधील लोक कोरफडीला अमरत्वाचं झाड असे संबोधतात. कोरफडचा वापर प्रामुख्याने सौंदर्य प्रसाधनासाठी केला जात असला तरी यामध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. कोरफडचा रस खूप आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी 1’, ‘बी 2’, बी 3’, ‘बी 6’, फोलिक अॅसिड हे घटक असतात. याच बरोबर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा केला जातो.

  • Product ID: 152
  • Volume: 1 LTR
Enquiry Now

ड्रीम्स ॲलोवेरा ज्यूसचे फायदे

१. भरपूर जीवनसत्वे आणि खनिजांचा साठा

कोरफडीच्या रसामध्ये जीवनसत्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. ह्या रसाचा वापर आपण सकाळी एनर्जी ड्रिंक म्हणून करू शकता. एक ग्लास कोरफडीच्या रसामध्ये भरपूर मॅग्नेशिअम, कॅलशियम, पोटॅशिअम आणि लोह यांचे प्रमाण असते.

२. शीत गुणधर्म

कोरफडीचा रस हा गुणधर्माने शीत असतो. रोज सकाळी हा रस सेवन केल्याने दिवसभर आपले पोट आणि पचनसंथा व्यवस्थित राहते. आपल्या शरीरातील उष्णता आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. उन्हाळ्यातर तर हा रस अत्यंत उपयोगी असतो.

३. सांध्यांच्या दुखण्यासाठी

ज्या व्यक्तींना गुडघ्यांचे किंवा सांध्यांचे दुखणे असते त्यांनी हा रस रोज घ्यावा. स्नायूंच्या दुखण्यावरही हा रस परिणामकारक आहे.

४. कोलेस्ट्रॉल ची योग्य मात्रा राखण्यास मदत

कोरफडीच्या रसामध्ये शीत गुणधर्म आढळतात त्यामुळे ते शरीरातील कोलेस्ट्रॉल ची मात्रा कमी करते. त्याचबरोबर ढोबळमानाने संपूर्ण शरीर निरोगी राहण्यास मदत होते. 

५. वजन कमी करण्यास उपयोगी

कोरफडीचा रस वजन कमी करण्यासही मदत करतो. रोजच्या सेवनाने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते आणि चयापचयाची क्रिया सुरळीत होते. 

६. स्वच्छता

कोरफडीच्या सेवनाने तोंडाची स्वच्छता राखली जाते त्यामुळे घश्याच्या आजारापासून मुक्ती मिळते.

७. मधुमेहावर उपयोगी

कोरफडीचा रस रोज सेवन केला तर रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते.  

८. पचनसंस्थेचे कार्य सुधारते

रोज सकाळी कोरफडीचा रस सेवन केल्याने पचनसंस्था व्यवस्थीत होऊन दिवसभर सुरळीत कार्य करते.

९. डोळ्यांचे सौंदर्य वाढवते

एका ग्लास पाण्यामध्ये थोडा कोरफडीचा रस टाका आणि सकाळी ह्या पाण्याने डोळे स्वच्छ धुवा. डोळे स्वच्छ ठेवण्याचा हा नैसर्गिक उपाय आहे .

 

ड्रीम्स डिटॉक्स ॲलोवेरा ज्यूस वापरण्याची पद्धत

10 ते 20 मिलि एक ग्लास पाण्यातून सकाळी घेणे

टीप - ड्रीम्स डिटॉक्स ॲलोवेरा ज्यूस घेतल्यानंतर अर्धा तास काहीही सेवन करू नये.   

Related Products

Back to Top